Saturday, September 9, 2017

यूपीएससीची तयारी : भूगोलाच्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा

यूपीएससीची तयारी : भूगोलाच्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा

मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात.

श्रीकांत जाधव | Updated: August 15, 2017 3:39 AM
465
Shares

मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात.

मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या संदर्भग्रंथाचा आढावा घेतलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे. आपणाला भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना या विषयाची विभागणी स्वतंत्रपणे दोन घटकांमध्ये करावी लागते. – पहिला घटक हा भारताचा भूगोल आणि दुसरा घटक जगाचा भूगोल. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ज्यामध्ये सामाजिक व आर्थिक भूगोल, आणि वसाहत भूगोल अशी विभागणी असते. प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये (२०१३-२०१६ पर्यंत) या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. भूगोल या घटकावर २०१३,२०१४,२०१५ व २०१६च्या मुख्य परीक्षेमध्ये अनुक्रमे ७, १०, ७ आणि ८ प्रश्न विचारण्यात आलेले होते. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे, पण बहुतांश  प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात. ज्यामध्ये भारताची प्राकृतिक

No comments:

Post a Comment