समीर कर्वे ठ्ठ मुंबई
ज्या देशाचा पंतप्रधान मुक्त अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो, त्या देशाच्या आर्थिक राजधानीला मात्र आज विकासाच्या आलेखाचा आढावा घेण्यासाठी तल्लख अर्थतज्ज्ञ मिळेनासे झाले आहेत. आथिर्क विकासाचा बहुअंगी विस्तार तसेच जागतिक पातळीवर होणाऱ्या नितनव्या घडामोडी बदलांचा भारतीय उद्योग, व्यापारउदिम यांच्यातील निर्णयांवर मोठा प्रभाव पडत असल्याने केवळ अर्थशास्त्र पदवीधर नव्हे तर आथिर्क घडामोडींचे विश्लेषक सध्या इण्डस्ट्रीला हवे आहेत, मात्र सध्याचे उमेदवार त्यात मागे पडत असल्याचे सत्य 'द इकॉनॉमिक्स क्लब' या अभ्यास गटाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
प्रा. राजम राजगोपालन (पोदार कॉलेज, माजी उपप्राचार्या), प्रा. सतीश मेनन (वालिया कॉलेज), जोस ऑगस्टाइन (विवेक कॉलेज), शोभना पणिकर (संशोधक) व अध्यक्ष जी. एस. पणिकर या मुंबईतील प्राध्यापकांनी 'द इकॉनॉमिक्स क्लब, मुंबई' या आथिर्क विषयांवर उपक्रम राबविणाऱ्या गटामार्फत तीन ते चार महिने उद्योग, व्यापार-उदिमाच्या क्षेत्रातील निर्णयक्षम हुद्द्यावरील व्यक्तींशी चर्चा करून एक सविस्तर अहवाल तयार केला आहे. अर्थशास्त्र पदवीधरांची रोजगारक्षमता : अपेक्षा आणि दरी
( एम्प्लॉयिबिलिटी ऑफ इकॉनॉमिक ग्रॅज्युएट््स : ब्रिजिंग द गॅप) या विषयावरील या अभ्यासात उद्योगक्षेत्राच्या गरजा आणि त्यांना पुरे पडण्याची शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने उमेदवारांची क्षमता हा मुख्य विषय होता. एकीकडे विदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्याचवेळी भारतीय बाजारपेठ ही मिश्र स्वरुपाची आहे. येणाऱ्या संधी आणि बाजारपेठ यांची सांगड घालून कमीत कमी वेळा त्यांचे विश्लेेषण करण्याची क्षमता असणारे अर्थतज्ज्ञ गरजेचे आहेत. विदेशातील वेळेनुसार एका रात्रीत विदेशी बाजारपेठेत काही उलटपालट घडले, तर त्याचे भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होतील, याचे तर्क किंवा आडाखे बिझनेस लीडर्सना सकाळी सकाळी टेबलावर लागतात. पण असे विश्लेषकच आपले शिक्षण क्षेत्र सध्या देऊ शकत नाही.
नवोदित उमेदवारांमध्ये विश्लेषणक्षमता, तर्कशास्त्र, अभिव्यक्ती कौशल्य, उत्साह, शिकण्याचा ध्यास, सिध्दांतांचा अभ्यास करण्याची तयारी व खऱ्या जीवनाशी ते जोडण्याचे कसब या सर्वांचा अभाव असल्याचा स्पष्ट निष्कर्ष यात काढण्यात आला आहे.
वानवा का?
या दरीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आयआयटी, आयआयएमच्या धतीर्वर आथिर्क विश्लेषणाचे ज्ञान देणाऱ्या दजेर्दार संस्थाच सध्या नाहीत. 'शैक्षणिक संस्थांमधून समस्यापूतीर्च्या (प्रॉब्लेमसॉल्विंग) असाइनमेन्ट््सच दिल्या जात नाहीत, विद्याथीर् मूळ लेख (ओरिजनल टेक्स्ट) वाचतच नाहीत व कित्येकदा शिक्षकही विद्यार्थ्यांना पुरेसे प्रेरित करीत नाहीत, अशी खंत बँक ऑफ बडोदाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. रुपा रेगे-नित्सुरे यांनी व्यक्त केली आहे. 'सध्याची व्यवस्था, अभ्यासक्रम आणि तपासणी अपुरी असून अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या आकलनास मर्यादा आहेत. ज्ञानाला व्यावहारिक संदर्भ देण्याची गरज आहे, असे मत टाटा ग्रुपचे निवृत्त अर्थतज्ज्ञ एस. एस. भंडारे यांनी व्यक्त केले आहे. निव्वळ पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशन वापरले म्हणजे अध्यापनाचा दर्जा उंचावला असे होत नाही, अशीही प्रति्क्रिया शिक्षणक्षेत्रातूनच नोंदविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment